1) किडनी स्टोन म्हणजे काय? आणि ते कसे तयार होतात?
किडनी स्टोन हे मिनरल्स आणि मिठापासून बनलेले कठीण डिपॉझिट्स असतात जे तुमच्या मूत्रपिंडात तयार होतात. जसजसे अधिक क्रिस्टल्स एक मेकांना जोडले जातात तसे त्यांचे मुतखड्यात रूपांतर होते. जेव्हा हे स्टोन्स तुमच्या युरिनरी ट्यूब्समधून शरीराबाहेर जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते वेदनादायक असू शकते. भरपूर पाणी पिणे आणि निरोगी अन्न खाणे ह्या २ गोष्टी किडनी स्टोन होण्यापासून वाचवू शकतात.
2) मुतखडा आणि पित्ताशयातील खडे हे एकच आहेत का?
हे दोन्ही पूर्णपणे वेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे उपचार देखील भिन्न आहेत. पित्ताशयातील खड्यांमुळे उजव्या बाजूस वरच्या ओटीपोटात वेदना होतात तर मुतखडा झालेला असताना ज्या मूत्रपिंड (किडनीमध्ये) मुतखडा झाला असेल त्यानुसार उजवीकडे किंवा डावीकडे वेदना होतात. पित्ताशयात खडे झालेले असल्यास पित्ताशय काढून टाकून उपचार केले जातात आणि मुतखड्यावर उपचार करताना आपण शस्त्रक्रियेने फक्त स्टोन्स काढून टाकतो, मूत्रपिंड नाही.
3) किडनी स्टोनमध्ये बिअर खरोखरच उपयुक्त आहे का?
मुतखड्यावर उपचार म्हणून बिअर प्यावी हि जेंव्हा औषधे उपलब्ध नव्हती तेंव्हाची संकल्पना होती. बिअर हे लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून कार्य करते आणि वेदना कमी करते. तसेच बिअरमध्ये ५% अल्कोहोल आणि ९५% पाणी असते, त्यामुळे बिअरमध्ये जास्त पाणी असते जे साध्या पाण्याप्रमाणे मुतखडा बाहेर टाकण्यास मदत करते. परंतु, बिअरमुळे जठराला सूज येणे, यकृतास हानी होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात तसेच तुम्ही पिऊन गाडी देखील चालवू शकत नाही, इतकेच नाही तर चालू असलेल्या औषधांवर देखील ह्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. या सगळ्याचा विचार करता बिअरला साध्या पाण्यापेक्षा अधिक महत्व देणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे भरपूर पाणी प्या कारण ह्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही.
Suffering from Kidney Stone